सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर बहिष्काराचे सावट

वार्षिक सहाशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिसभेची (सीनेट) मिटींग ऑनलाईन होणार आहे. या ऑनलाईन सभेस नाशिकच्या काही सीनेट सदस्यांनी विरोध केल्यामुळे महत्वाच्या सभेवर बहिष्काराचे सावट आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांना ऑनलाईन सभा घेण्याची परवानगी कोणत्या नियमांच्या आधारे दिली. याविषयी सिनेट सदस्यांनी विचारणा केली. मात्र, त्यांचे फोनच उचलले जात नसल्याची तक्रार प्रा. डॉ. नंदू पवार यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आडून विद्यापीठ आता राजकारण करत असल्याचा आरोप सीनेटचे सदस्य अमित पाटील यांनी केला. त्यामुळे ही सभा होणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबतचा आढावा आपलं महानगरने घेतला आहे.

First Published on: June 24, 2020 6:04 PM
Exit mobile version