नवीन कराप्रमाणे सव्वा कोटीची कर वसुली

कल्याण डोंबिवली महापालिकेन एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला सुरुवात केली. प्रथम सहामाही रुपये ३०० आणि द्वितीय सहामाही रुपये ३००, असे एकूण ६०० रुपये कर वसुली सुरू केली. या वसुलीला भाजपने तीव्र विरोध करत गेले काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा कर रद्द करावा, अशी मागणी केली होती. तसेच भाजपने शहरात बॅनर लावत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर टिका केली. मात्र, या कराला नागरिकांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण देत कल्याण-डोंबिवलीत गेले काही दिवसात सव्वा कोटीची कर वसुली झाल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले असून कर रद्द करण्याबाबत एक ही नागरिकांनी तक्रार केली नसल्याचे सांगत नागरिकांचे आभार मानले. मात्र, यामुळे भाजपच्या बॅनरबाजीला नागरिकांची ठेंगा दाखवला की काय याची चर्चा आता रंगू लागली आहे.

First Published on: June 5, 2021 2:15 PM
Exit mobile version