‘त्या’ इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडीचे फुटेज आले समोर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेरील सीसीटिव्ही फुटेज आता समोर आले आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी महत्वाचा दुवा मानला जात आहे. कारण संशयित पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत बसून मुंबईबाहेर फरार झाले होते. तेव्हापासून मुंबई पोलीस या पांढऱ्या रंगांच्या गाडीचा शोध घेत होती. मुंबई ठाणे,पुणे, नाशिक या भागातील सर्व हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज हॉटेल्समधील सीसीटीव्ही फुटेज पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज आणि टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलीस तपासत होते. अखेर आता हे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यामुळे आता लवकरच स्फोटकांचा मास्टरमाईंड कोण हे समोर येईल.

First Published on: March 15, 2021 5:14 PM
Exit mobile version