गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने पैसे वाटल्याचा चंद्रकांत खैरेंचा आरोप

शिवसेना दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. गर्दी जमवण्यावरुन दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी 52 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका जिल्ह्याचा खर्च 1 कोटीच्या घरात आहे. तसेच एक बसचा खर्च जवळपास 70 ते 80 हजार असल्याचा आरोप खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे. अशा प्रकारे 36 जिल्ह्यांचा एकूण खर्च 52 कोटींच्या घरात जातोय, असे खैरे यांनी सांगितले. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने 52 कोटी खर्च करीत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

First Published on: October 1, 2022 6:43 PM
Exit mobile version