अनिल देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी रात्री उशीरा अटक केली आहे. १०० कोटी खंडणी प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीने ५ वेळा बोलवले होते परंतु अनिल देशमुख हजर राहिले नाही. या काळात अनिल देशमुख यांनी ईडीला पुरेसा वेळ दिला असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. अनिल देशमुखांना सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे चौकशीला हजर रहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कोणतीही चुक माफ होणार नाही मग ती भाजपचीही असो दोषींवर कारवाई होणार असं वक्तव्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

First Published on: November 2, 2021 11:04 AM
Exit mobile version