फडणवीसांचा निर्धार सांगताना चंद्रकांत पाटलांची तुटली खुर्ची

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सोलापूर मध्ये पत्रकार परिषद होती. याचदरम्यान अचानक खुर्ची पाय तुटल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा तोल गेला. यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना वाचवलं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडून कुठे जाणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणतं असताना अचानक खुर्चीचा पाय तुटला. त्यामुळे सध्या या सर्व प्रकारामुळे चंद्रकांत पाटील चर्चेत आले आहेत.

First Published on: February 12, 2020 5:32 PM
Exit mobile version