निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मागाणी करणार

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येणार आहे. परंतु निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात राज्य निवडणूक आयोग आयुक्त यू पी एस मदान यांची भेट घेणार असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 9, 2022 12:49 PM
Exit mobile version