आता आरोग्य सेतूवर लसीकरणाचे अपडेट

कोविड १९ प्रतिबंधक लस घेतली आहे का? लसीकरणाचे किती डोस झाले आहेत? हे आता आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. नागरिकांना आरोग्य सेतू ॲपवर लसीकरणानंतर ब्लू शील्ड आणि दोन ब्लू टिक दाखवता येणार आहेत. याचा अर्थ लसीकरणाचे दोन्ही डोस संबंधित नागरिकाचे पूर्ण झाले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत.

First Published on: June 2, 2021 5:13 PM
Exit mobile version