यूपी भैयांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री चन्नींना फटकारलं

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. परप्रांतीयांच्या विषयावर वाद निर्माण झाला आहे. या वादामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेनेही उडी घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यात पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या जनतेला आणि मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे पंजाबमध्ये परप्रांतीयांवरुन वाद निर्माण झाला आहे.

First Published on: February 18, 2022 2:13 PM
Exit mobile version