शिंदे गटातील खासदाराचे शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद २०२४मध्ये राहणार की जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुंबई महानगरपालिका महापौर आणि २०२४मधील मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. पालिकेवर महापौर आणि राज्यातील एकहाती सत्ता हे भाजपचं स्वप्न असताना कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदेच पुढील मुख्यमंत्री असतील, असे विधान केलं आहे. तसेच पालिकेवर शिंदे गटाचा महापौर बसेल असं म्हटलं आहे.

First Published on: January 30, 2023 4:16 PM
Exit mobile version