मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांवर घणाघात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांना टोला लगावला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत असे असताना जर आम्ही चहापान केला तर तो द्रोह होईल यावर मुख्यमंत्री म्हणाले की, हसीना पारकर हिला चेक दिले होते. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. त्यांनी खरा देशद्रोह केला होता. पण त्यांचा राजीनामा घेण्याची यांनी हिंमत नाही दाखवली. बर झाले त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिण्याची आमची वेळ टळली,’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

First Published on: February 27, 2023 11:42 AM
Exit mobile version