मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी स्टेटस को मेंटेन ठेवावा असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच पुढील सुनावणी १ ऑगस्टला असल्यामुळे राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार अशी चर्चा सुरु आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कोणतीही अडचण नाही असे सांगितले आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

First Published on: July 20, 2022 9:29 PM
Exit mobile version