आर्यन खान ड्रग्जप्रकरणी SIT चा खुलासा, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

2 ऑक्टोबर 2021 ला मुंबईहून गोव्याल्या जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी केली होती. या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. दरम्यान एनसीबीने केलेल्या या कारवाईवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपवण्यात आली होती. आता एसआयटीने केलेल्या चौकशीमध्ये महत्त्वपूर्ण माहिती समोर आलीये. आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.

First Published on: March 2, 2022 4:53 PM
Exit mobile version