मास्कबाबत आरोग्य सचिवांच्या पत्रावर राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने आज पुन्हा सार्वजनिक ठिकाणी तसेच बंदिस्त ठिकाणी नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे म्हणत काही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. यावरून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही पत्रकार परिषद घेत मास्क संदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आरोग्य सचिवांच्या पत्रांत नेमक काय म्हटले आहे आणि राजेश टोपे नेमकं काय म्हणाले तसेच ही मास्क सक्ती नेमकी कशाप्रकारे लागू करण्यात आली, ते व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: June 4, 2022 6:45 PM
Exit mobile version