लहानग्याला एकटंच जाव लागतंय अ‍ॅम्ब्युलन्समधून

कोरोनाचा आजार संसर्गाने होतो. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यांच्या जवळपासही कोणी भटकत नाही. मात्र आपल्या प्रिय व्यक्तीला कोरोना होणे आणि त्याच्यापासून असे अंतर ठेवणे जीवाला चटका लावणारे आहे. अशावेळी लहान मुलांना कोरोना होत असेल आणि त्यांना एकटं उपचारासाठी जावं लागत असेल तर कोणाचेही मन हळवे होईल. असाच एक व्हायरल व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा कोरोनाबाधिक मुलगा एकटाच अॅम्ब्युलन्समध्ये बसून उपचारासाठी जात आहे. तर शेजारचे सगळे त्याला पाहून हळहळत आहेत. त्यामुळे आतातरी घरात बसा आणि आपल्या मुलांना सांभाळा, हेच योग्य होईल.

First Published on: May 17, 2020 4:40 PM
Exit mobile version