सायन हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णाचे पलायन

सायन हॉस्पिटलमधून ३ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजून ४५ मि. ला वॉर्ड क्र. ५ च्या समोरील जाळीच्या खिडकीतून एका कोरोना संशयित रुग्णाने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीपीई किट घालून असलेले कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक लहुसो चव्हाण यांनी त्या रुग्णाला पकडून पुन्हा वॉर्डमध्ये आणले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटजे समोर आले असून सुरक्षा रक्षकासमोरच रुग्णांने पळून जात असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: May 8, 2020 10:05 AM
Exit mobile version