करोनाच्या अफवेमुळे कोंबड्या फुकट देण्याची आली वेळ

करोना व्हायरसचा मोठा फटका पोल्ट्री धारकांना बसलाय आणि सीमाभागातल्या म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग चिक्कोडी या भागात तर पोल्ट्री धारकांनी विनामूल्य कोंबडी वाटप सुरू केलंय. या भागांमध्ये दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास चार हजारहून अधिक कोंबड्या आणण्यात आल्या होत्या आणि त्यांचं मोफत वाटप या भागात करण्यात आलं.

First Published on: March 12, 2020 9:00 PM
Exit mobile version