करोनामुळे येवल्यातला पैठणी व्यापार ठप्प

कोरोना व्हायरसचा फटका आता येवल्यातील पैठणी व्यवसायालादेखील बसू लागला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे दक्षिण भारतासह इतर ठिकाणहून येणारा ग्राहकवर्ग बंद झाल्याने पैठणी उत्पादक आणि विक्रते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पैठणी उत्पादकही आता ‘गो- कोरोना’ म्हणू लागले आहेत. कोरोनामुळे पैठणीवरील मोरही नाचेनासे झाला आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला असून, येवल्यातील प्रसिद्ध अशा पैठणी व्यवसायाला त्याची झळ पोहोचली आहे. येवल्यात छोटे मोठे जवळपास ६०० ते ७०० दुकाने आहेत. हजारो ग्राहक पैठणी खरेदीसाठी इथे येत असतात. परंतु कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनी येवल्याकडे पाठ फिरविल्याने पैठणी व्यवसायावर मोठी मंदीची लाट दिसून येत आहे.

First Published on: March 25, 2020 6:02 PM
Exit mobile version