नाशिकमध्ये ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले

मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील ५१ वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, अहवाल येण्याआधीच एकाचा बुधवारी (दि. ८)  मृत्यू झाला. रात्री उशिरा मालेगावातील सहाजणांचे रिपोर्ट रुग्णालयास मिळाले आहेत. त्यातील पाचजण पॉझिटिव्ह असून मृत व्यक्तीचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. नाशिक जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. पाच मालेगांव, नाशिक शहर आणि लासलगावामधील प्रत्येकी एक आहे.

First Published on: April 9, 2020 8:57 AM
Exit mobile version