मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही या काळात उपासमारीची वेळ

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे  गेल्या पाच महिन्यापासून प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईतील कामाठीपुरा या रेडलाईट भागातील देहविक्री करणाऱ्या  महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही या काळात उपासमारीची वेळ आली. या संकट काळात स्वतःचे आरोग्य जपत कुटुंबियांना पोसायचे कसे? मुलानां शिक्षण कसे द्यायचे असा मोठा प्रश्न देहविक्री करणाऱ्या महिलांपुढे निर्माण झाला आहे. कामाठीपुऱ्यातील अनेक समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन या महिलांना रेशन, जेवणाची पाकिटे पुरवली. तसेच आरोग्य तपासणी शिबिरे आणि  कोरोना संबंधित जनजागृती करण्यात आली होती. मुंबईत नेहमीच कुचेष्टेचा विषय असलेल्या कामाठीपुरा या रेडलाईट परिसरातील एकही रुग्ण आढळून आले नाही. मात्र आता या कोरोना काळात पोट कसे भरायचे, या कोरोनामुळे ना ग्राहक, ना पैसे आणि ना सरकारकडून मदत अशा परिस्थिती त्यांच्यावर आज संकट ओढावले आहे.

First Published on: August 28, 2020 8:25 PM
Exit mobile version