सेल्फ टेस्ट किटमुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होतेय घट

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे देशभरामध्ये कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीतांच्या रुग्णसंख्येत अचानक घट झाल्याचे निदर्शनास आले. मात्र ही आकडेवारी कितपत खरी आहे याबाबत पालिकेने देखील संशय व्यक्त केला आहे. कारण अनेक लोकं घरच्या घरी कोरोना सेल्फ टेस्ट किटच्या आधारे कोरोनाची चाचणी करतात मात्र याचा अहवाल हा सरकारपर्यंत पोहोचत नाही. यामुळे कदाचित रुग्णसंख्येबाबत शंका व्यक्त केली जातेय. दरम्यान कोरोना सेल्फ टेस्ट किटच्या आधारे कोरोना चाचणी कशाप्रकारे केली जाऊ शकते तसेच याचा अहवाल कशा प्रकारे तुम्ही सरकार पर्यंत पोहचवू शकतात जाणून घेऊयात.

First Published on: January 12, 2022 7:02 PM
Exit mobile version