गर्दीच्या हॉटस्पॉट्समध्येही माणस शोधून सापडेनात

चाकरमान्यांची, कष्टकऱ्यांची सर्वाधिक गर्दी, वस्ती असलेली ठिकाणे म्हणजे कुर्ला, सायन, दादर, ठाणे. माणसांच्या गर्दीतून अनेकदा वाट हरवून जाते असा एरव्हीचा अनुभव. पण आजच्या जनता कर्फ्युमुळे रोज इथे इतकी गर्दी होते असा विरोधाभासच मुंबईकरांच्या अनुपस्थितीमुळे तयार झाला आहे. दादर, कुर्ला, सायन, ठाणे परिसरात नागरिकांची संख्या कमी होतानाच प्लॅटफॉर्मवरही प्रवास करणाऱ्यांची गर्दी आज झपाट्याने कमी झाली आहे. स्टेशन बाहेरील परिसरातील दुकाने आज १०० टक्के बंद असल्याने दरदिवशी हजारोंच्या संख्येने गर्दी करणारे मुंबईकर आज शोधून सापडेनासे झाले होते.

First Published on: March 22, 2020 12:34 PM
Exit mobile version