लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात उभारण्यासंदर्भात दादरवासीयांचं मत काय?

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यांचा अंत्यसंस्कार विधी हा दादरच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आला. आता याच ठिकणी त्यांचं स्मारक उभारावं, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शिवाजी पार्क हे मुलांसाठी खेळण्यासाठीच असावं, असं मत काही जणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिवाजी पार्क हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे, जिथे मुलं ही मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी येत असतात. याबाबत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात.

First Published on: February 9, 2022 6:14 PM
Exit mobile version