कुंपणच शेण खायला लागलं तर अपेक्षा कुणाकडं करायची

औरंगाबाद बीड बायपास कामकाजाबद्दल बोगस किंवा काम न करता रोजगार हमीचे काम दाखवून बिले घेतल्याचे आता समोर आले आहे. त्या ठिकाणी दत्ता बोरडे नावाच्या एनसीपीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही बाब समोर आणली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे जे कामगार दाखवण्यात आले आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून देखील कामावर कशी काय गेली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा घोटाळा नेमका काय आहे? खरं म्हटलं तर कुंपणच शेण खायला लागलं तर अपेक्षा कुणाकडं करायची, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

First Published on: May 22, 2021 7:22 PM
Exit mobile version