ठाकरे गट – शिंदे गट एकत्र यावे अशी जनतेची इच्छा – दीपक केसरकर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. परंतु त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर ठाकरे गटात आहेत. लवकरच अमोल कीर्तिकर बाळासाहेबांचा विचार असलेल्या शिंदे गटात येतील, असा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलाय. तसेच भविष्यात दोन्ही गट एकत्र यावेत अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

First Published on: November 14, 2022 1:40 PM
Exit mobile version