‘महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही’

काँग्रेस पक्षाकडून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले असून, एकात त्यांना माफीवीर तर दुसर्‍यामध्ये चक्क बलात्कारी असे संबोधण्यात आले आहे. तसंच, काँग्रेसच्या मासिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावकरांवर गलिच्छ लेख हा लिहिल्याप्रकरणामध्ये शिदोरी मासिकावर बंदी घालावी अशी ही मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसने महापुरुषांचा अपमान करण्याची मालिका सुरू केली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही अशी ही भूमिका फडणवीसांनी मांडली आहे.
First Published on: February 13, 2020 8:30 PM
Exit mobile version