हल्लेखोरांना संरक्षण दिलं तर पोलिसांची देखील पोलखोल करू – देवेंद्र फडणवीस

भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथाला अज्ञातांनी तोडफोड केली. दरम्यान या रथाची तोडफोड ही शिवसेनेने केली असा आरोप भाजपतर्फे करण्यात आलाय. यासंदर्भात राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी भाष्य केलंय. पोलखोल आम्ही रोज करतोय. ,ज्यांची पोलखोल होते आहे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे,त्यातून ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत,त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही पोलखोल कार्यक्रम सुरूच राहणार आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले तर आम्ही पोलिसांची देखील पोलखोल करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: April 21, 2022 2:49 PM
Exit mobile version