संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती, देवेंद्र फडणवीसांचा टोला

आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढलो ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मतं मिळाली. २०२४ ला आम्ही ही जागा जिंकू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज ठाकरे यांनी अयोध्याला जाणे यात गैर नाही, कोणीही प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला जाऊ शकतो. खासदार संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती आहेत, ते दिवसभर बोलत राहतात आणि ते मोकळे आहेत, त्यांना कामं नाहीयेत. परंतु आम्हाला कामं आहेत. तसेच आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत आहोत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

First Published on: April 17, 2022 6:20 PM
Exit mobile version