भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडेंनी साधला पंकजा मुंडेवर निशाणा

आज परळीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या रस्त्यांच्या विकास कामावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून भूमिपूजनास सुरुवात झाली आहे. दरम्यान झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधत, ही काम भाजपच्या माध्यमातून होत आहे. असं म्हणणं हा त्यांचा गोड गैरसमज असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या विकास कामावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

First Published on: January 16, 2022 4:08 PM
Exit mobile version