सायन कोळीवाडामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने दारू विक्री

लॉकडाऊनमध्ये दोन दिवसापासून दारू विक्री सुरू झाली असून दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी सायन कोळीवाड्यातील राज वाईन शॉपसमोर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दारू विक्री करतानाचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक ग्राहकाला टोकन देऊन, त्यांचे हात सॅनिटाईज करून मगच त्यांना दुकानासमोर प्रवेश दिला. एकावेळी एक ग्राहक अशी व्यवस्था केल्यामुळे पहिल्या दिवशी झालेला ग्राहकांचा गोंधळ टाळता आला. येथील दारू विक्रीची शिस्त सर्व दुकानांसमोर आल्यास पोलिसांवरीलही गर्दी आटोक्यात आणण्याचा ताण कमी होण्यास मदत होईल.

First Published on: May 5, 2020 11:35 AM
Exit mobile version