‘पिरेम’ सिनेमाद्वारे दिव्या पुगावकर रूपेरी पडद्यावर

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत काम करत असलेल्या दिव्या आता घराघरांत पोहोचली आहे. तिने साकारलेल्या मुक्या तरुणीच्या भूमिकेचे आणि तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. पिरेम या सिनेमातील प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेद्वारे दिव्या पुगावकर रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन प्रदीप लायकर यांनी केले.

First Published on: November 14, 2021 4:24 PM
Exit mobile version