नव्याने पहिल्यापासून लसीकरणाची गरज नाही

४५ पुढील वयोगटातील नागरिकांना लशीचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येईल, असे राज्य सरकारने ठरविले आहे. यामुळे या वयोगटातील नागरिकांसाठी अधिक लशी उपलब्ध होतील. लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी जो कालावधी देण्यात आला असेल, तो उलटून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतला पाहिजे. तो बुस्टर डोस आहे. त्यामुळे आपले संरक्षण वाढणारच आहे. उशीर झाला म्हणून पुन्हा नव्याने पहिल्यापासून लसीकरणाची गरज नाही. दुसरा डोस थोडा उशीरा मिळाला तरी तो घेऊन टाकावा, असे या संदर्भात तज्ज्ञांनी म्हटले आहे.

First Published on: May 12, 2021 6:10 PM
Exit mobile version