दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सीईओ यांचा विश्वास

पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन महिन्यात कोरोनाचे ८०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना रुग्णांवर या ठिकाणी ३०० डॉक्टरसह ४५०० कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र यापैकी फक्त २४ डॉक्टरांना करोनाची प्राथमिक लागण झाली असून तेसुद्धा यातून लवकर बाहेर येतील. एवढ्या मोठ्या डॉक्टर आणि कर्मचारी हजारो रुग्णांवर उपचार करत असताना मंगेशकर हॉस्पिटलने करोनावर विजय मिळवला याचे मुख्य कारण म्हणजे जलनीतीचा वापर. ही जलनीती कोरोना बरा करत नाही, पण तुम्हाला त्याची लागण होण्यापासून संरक्षित करते, असा विश्वास मंगेशकर हॉस्पिटलचे डिन डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केला.

First Published on: July 1, 2020 2:10 PM
Exit mobile version