खडसे ईडी नोटीसवर म्हणाले होते…

एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते, ‘माझ्या मागे ईडी लावली, तर मी सीडी लावीन’! आता एकनाथ खडसेंच्या त्याच विधानाचा संदर्भ वास्तवात उतरताना दिसू लागला आहे. कारण एकनाथ खडसे यांना ईडीनं नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून तसं झाल्यास, आता नाथाभाऊ नेमकी कोणती सीडी लावणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: December 26, 2020 11:59 AM
Exit mobile version