पायी वारीबाबत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत

मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते. हा पायी यात्रा सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. या पायी वारीमध्ये हजारो लोक सामील होत असतात. तसेच यात्रेमध्ये प्रत्येक गावांमध्ये मुक्काम असतो. तर मुक्कामाच्या दरम्यान गावातील लोक मुक्ताबाईच्या पादुकांची पूजा करतात आणि पालखी सोहळा पुढे जात असतो. ही परंपरा राहिली आहे. परंतु, आता कोविडमुळे मागच्या वर्षी आणि यावर्षी या परंपरेला छेद दिला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी आम्हाला दिली आहे.‌ पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावं, ही वारकऱ्यांची इच्छा असते. परंतु, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले आहेत. या प्रस्तावाचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते, अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: June 12, 2021 7:12 PM
Exit mobile version