बंगळुरूत एकनाथ शिंदेंनी केली कोचेसची पाहणी

मेक इन इंडिया अंतर्गत BEML कंपनीने भारतातच बनवलेले मेट्रो कोच तयार झाले असून पहिला मेट्रो कोच येत्या २७ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होईल. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगळुरूमध्ये या कंपनीच्या वर्कहाऊसमध्ये जाऊन या कोचेसची पाहणी केली. एकूण ५७६ कोचेसीच वर्क ऑर्डर या कंपनीला देण्यात आली आहे. आत्तापर्यंत परदेशातून आयात कोचेसची प्रत्येकी किंमत १० कोटी इतकी होती. आता भारतात बनवलेल्या कोचेसची प्रत्येकी किंमत ८ कोटी इतकी असेल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

First Published on: January 19, 2021 3:37 PM
Exit mobile version