मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचं नागरिकांनी पालन करा

देशावर कोरोनाच्या रुपाने मोठं संकट आलं आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. घरातून बाहेर पडू नका, तर करोनाशी सामना करता येईल असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

First Published on: March 27, 2020 3:21 PM
Exit mobile version