एकनाथ शिंदेंची श्रीधर पाटणकरांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

ईडीच्या कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही, असा इशारा ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला दिला आहे. ठाण्यात आज ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या संपत्तीवर मोठी कारवाई केली. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. ईडीच्या या कारवाईवर आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलय

First Published on: March 22, 2022 9:09 PM
Exit mobile version