ओडिशामध्ये हत्तीला वाचविण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

ओडिशाच्या सुंदरगढ येथे चिखल आणि पाण्याने व्यापलेल्या एका विहिरीत हत्ती पडला होता. या हत्तीला वाचविण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्तीला वाचविण्यासाठी वन कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी स्थानिकांना घेऊन प्रयत्नांची शर्थ केली. तेव्हा कुठे जाऊन हत्ती बाहेर आला. बाहेर आल्यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने पळत सुटला.

First Published on: October 25, 2019 8:39 PM
Exit mobile version