पर्यावरण दिन विशेष, रस्त्यालगत लावलेल्या झाडांना विनोद बुटालांकडून जोपासण्याचे काम

एकीकडे विविध विकास कामांमध्ये तसेच वाढत जात असलेल्या शहरीकरणांमध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. अशा स्थितीत शहरातील विनोद बुटाला हे मात्र वृक्षांचे जतन करण्याचं काम गेली तीन वर्षं करत आहेत. आज या वृक्षांची सावली महाडकर नागरिकांना सुखावत आहे. वृक्षकराच्या माध्यमातून नगरपालिका देखील मोठ्या प्रमाणामध्ये करवसुली करते. मात्र शहरांमध्ये वृक्षांची संख्या वाढण्याऐवजी रस्ते रखरखीत होत असल्याचे दिसत आहे. विनोद बुटाला यांच्याप्रमाणे अन्य नागरिकांनी देखील आदर्श घेऊन आपल्या दुकानासमोर, आपल्या घरासमोर, सोसायटीमध्ये वृक्षांची लागवड केल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.

First Published on: June 4, 2023 2:10 PM
Exit mobile version