लोकांची फसवणूक करणाऱ्या त्याला पोलिसांनी पकडले

‘मृत आत्म्याशी बोलून वशिकरणाद्वारे पैशांचा पाऊस पाडून दिलेली रक्कम ही ५० पट करून देतो’असे आमिष दाखवून शेकडो जणांना फसवणाऱ्या एका भोंदू बाबाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट ९ ने अटक केली आहे. २८ डिसेंबर रोजी मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये हा आरोपी एका इसमास पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतला.

First Published on: January 2, 2020 3:19 PM
Exit mobile version