अन्यथा विमा कंपनीच्या मालकाच्या घरावरही आंदोलने करु

गेल्या बारा वर्षांपासून शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देणारे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पिकविमा मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे गावात ११ हजाराच्या रोख रक्कमेसह त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, “अजूनही राज्यातील अनेक शेतकरी विमा भरपाई पासून वंचित असल्याचे फोन येत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घालून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांना भरपाई जमा करण्यास भाग पाडावे. अन्यथा सोहळा जूनपासून संबंधित सर्व राज्यस्तरीय कार्यालयासह विमा कंपनीच्या मालकाच्या घरावरही आंदोलने केली जातील”, असा खणखणीत इशाराही शंकर गायकवाड यांनी दिला.

First Published on: June 8, 2021 12:23 PM
Exit mobile version