कोरोनाला हरविण्यासाठी कोकणातील शेतकरी सज्ज

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी खबरदारीचे उपाय अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु कोकणात मुख्य व्यवसाय हा आंबा असून सध्या लॉकडाऊनमुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी आंबा व्यवसायासोबत जोड उत्पन्न म्हणून सुपाऱ्यांची लागवड केली आहे. असेच नेवरे गावचे शेतकरी संदीप जोशी यांची ३०० ते ४०० सुपाऱ्यांची झाडे आहेत. त्यातून ते दरवर्षी साधारण २ लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. तर सुपाऱ्यांची लागवड, निगा आणि उत्पन्न याशिवाय माहिती घेणारा हा खास रिपोर्ट. (सागर नेवरेकर, प्रतिनिधी, नेवरे, रत्नागिरी)

First Published on: May 14, 2020 5:06 PM
Exit mobile version