कोरोनाच्या भीतीपोटी चाकरमान्यांनी गाठले कोकण

मुंबई-पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. मूळचे कोकणातील रहिवासी हे कामानिमित्त मुंबई व पुण्यात मोठ्या संख्येने राहतात. परंतु, सध्या या दोन्ही शहरामध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे चाकरमानी हा कुटुंबसहित कोकणात धाव घेत आहे. हा चाकरमानी मिळेल त्या वाहनाने किंवा पायी प्रवास करत कोकण गाठत आहे. कोकणातील गावकरी हा येणाऱ्या चाकरमान्यांची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देत आहे. त्यांना एक वेगळे घर देऊन १४ दिवस क्वारनटाईनमध्ये ठेवले जात आहे. यावेळी, त्यांच्या जवळ कोणताही गावातील व्यक्ती फिरकणार नाही याची काळजी घेतली जातेय. तसेच गावकऱ्यांकडून क्वारनटाईन केलेल्या व्यक्तींना अन्नधान्य पुरविले जाते. आणि त्याची काळजी घेतली जात आहे.

First Published on: May 19, 2020 5:32 PM
Exit mobile version