सेवा निवृत्त परिचारीकेची कोरोना रुग्णांना मेजवानी

ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त झालेल्या, माजी महिला वॉर्डच्या नर्स संध्या रसाळ यांनी स्वयंपूर्तीने, रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात आपल्या हाताने पिठलं भाकरी बनवून ती रुग्णांना खाऊ घातली आहे. चपाती ऐवजी भाकरी मिळाल्याने रुग्णांनी मोठया आवडीने पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांना इतरांनादेखील अशा प्रकारे मदत करण्याचे आव्हान केले आहे.

First Published on: June 1, 2021 7:44 PM
Exit mobile version