नाशिकच्या महात्मा नगर येथे कारडा व्यावसायिक संकुलाला भीषण आग

नाशिक येथील महात्मा नगर येथे कारडा व्यावसायिक संकुलात भीषण आग लागली. मागील ३ तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरीही आग आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाचे ७ बंब सातत्याने प्रयत्नशील आहेत. आगीने रौद्रवतार धारण केले असून जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो.

First Published on: September 7, 2019 3:38 PM
Exit mobile version