अंधेरीच्या मरोळ रोल्टा इमारतीला आग

अंधेरीत एमआयडीसीपरिसरात मोठी आग लागली आहे. अंधेरीतील रोलटा कंपनीच्या इमारतीला आग लागली आहे. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या १९ गाड्या रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीतील लोकांना सध्या बाहेर काढण्यात आले आहे. इमारत पुर्णत: रिकामी करण्यात आली आहे. सध्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

First Published on: February 13, 2020 3:00 PM
Exit mobile version