छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले भव्य मंदिर भिवंडीत

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारत आहेत. शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा संकल्प केला गेला व त्यानंतर २०१८ मध्ये  या मंदिराचे भूमिपूजन झाले. या मंदिराचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.  या मंदिराची रचना किल्ल्याच्या तटबंदी सारखी असून आतील बाजूस ४० कप्पे आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐतिहासिक शिल्पाच्या माध्यमातून साकारले जाणार आहे.

First Published on: July 7, 2021 5:17 PM
Exit mobile version