शाहरुख खानचा ‘झिरो’ आला!

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा बहुचर्चित ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या दोन चित्रपटांमध्ये शाहरुखला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे ‘झिरो’पासून शाहरुखला खुपच अपेक्षा आहेत. मात्र पहिल्या काही तासांमध्ये आणि समीक्षकांच्या मतांवरून ‘झिरो’ चित्रपट यशाच्या शिखरावर पोहोचेल असे वाटत नाही. ‘झिरो’च्या प्रदर्शनाचा हा पहिला दिवस असल्याने पुढे शाहरुखचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करतील अशी आशा आहे.

First Published on: December 21, 2018 6:18 PM
Exit mobile version