नाशिकमध्ये फुलांचा महोत्सव

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये फुलांचा महोत्सव भरला आहे. नाशिक महापालिकेच्यावतीने राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुष्पप्रदर्शनाचे उदघाटन सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते झाले. पुष्पोत्सवात विविध गटातील स्पधार्र्चेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार,गुलाब राजकुमारी ही मानांकनाची बक्षिसे पुष्पोत्सवात देण्यात येतील.

First Published on: February 21, 2020 10:37 AM
Exit mobile version